उत्तरदायित्व फाउंडेशन, समन्वय आणि केशव गोरे स्मारक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 27 ऑक्टोबर 2027 रोजी केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मृणालताई दालन,आरे रोड,गोरेगाव पश्चिम, मुंबई या ठिकाणी कायदेमंडळाची कर्तव्ये आणि लोकांचे प्रश्न या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली . संपर्क संस्थेच्या प्रमुख श्रीमती मेधा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये अशोक राजवाडे यांनीही मार्गदर्शन केले.. कार्यशाळेला विविध मुंबईच्या उपनगरातील विविध ठिकाणाहून लोक आले होते.